चाळीसगाव मतदारसंघात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मतदान करतानाचे फोटो व्हायरल !

0

जळगाव: आज संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाले आहे. मतदानादरम्यान मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातलेली असताना देखील जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात अतिउत्साही व हौशी मतदाराने मतदान केंद्रामध्ये मतदान करतानाचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. या प्रकारामुळे सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. एका मतदाराने हातात भाजपचा ब्रेसलेट घातले असून तो राष्ट्रवादीला मतदान करत असल्याचा फोटो सोशल मिडीयात व्हायरल होत आहे.

निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आलेली आहे, असे असतानाही मतदान करतानाचे फोटो व्हायरल झाले आहे. या प्रकारावरून निवडणूक आयोगाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे