चाळीसगाव । येथील आर्टस्, कॉमर्स आणि सायन्य महाविद्यालय विद्यार्थी विकास विभागातर्फे जागतिक तापमान वाढीचा वातावरणावर होणारा परिणाम-जाणीव जागृती कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेचे उद्घाटन उमवि संचलित महात्म गांधी तत्वज्ञान केंद्राचे सदस्य तसेच माजी भूगोल विभाग प्रमुख प्रा.एल.व्ही.पाठक यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, जागतिक तापमान वाढीचा मानवी जीवनावर जो विपरीत असा परिणाम होत असतो त्या संदर्भात वेळीच उपाय योजना केल्यास भविष्यात होणार्या दुष्परिणामांपासून आपणास बचाव करता येईल. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यशाळेचे चा.ए.सो. उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, उपाध्यक्ष), प्राचार्य मिलिंद बिल्दीकर, उपप्राचार्य डॉ.प्रकाश बाविस्कर, उपप्राचार्य एस.ए.मुठाणे, उपप्राचार्य अजय काटे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.पंकजकुमार नन्नवरे, रजिस्ट्रार हिलाल पवार, भूगोल विभाग प्रमुख प्रा. यू.के. देशपांडे, प्रा.डी.एल.वसईकर, प्रा.जी.बी.शेळके, सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.आर.बी.पाटील आदी उपस्थित होते.
दुसक्षर्वीज्ञ सत्रात अक्कलकुवा महाविद्यालयाचे भुगोल विभागाचे प्रमूख प्रा. अंकुश खोब्रागडे यांनी पर्यावरण संवर्धन कसे करावे या विषयी मार्गदर्शन केले. तिसर्यान सत्रात वाय.एन.महाविद्यालयातील भूगोल विभाग प्रमुख प्रा.डॉ.एस.एम.लवांदे यांनी ‘स्लाईड शो‘ द्वारे जागतिक तापमान वाढीचे प्रमाण व त्यावरील उपाय योजना या विषयी मार्गदर्शन केले. तसेच प्रा.डी.एल.वसईकर यांनी जैविक उर्जेसंदर्भात मार्गदर्शन केले. कार्यशाळेचा समारोप सर्पमित्र मा.राजेश ठोंबरे यांच्या हस्ते झाला.या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना वन्यजीव प्राणी व निसर्गाप्रती असलेली आपली भूमिका या विषयी मार्गदर्शन केले. त्यांच्याहस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ.प्रकाश बाविस्कर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.पंकजकुमार नन्नवरे यांनी केले. सूत्रसंचालन सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.आर.बी.पाटील यांनी तर आभार नितिन खैरे याने मानले.