चाळीसगाव – येथील धुळे रोडवरील आर्टस, सायन्स आणि कॉमर्स महाविद्यालय परीसरात डॉ.विनोद कोतकर बॉटनीकल गार्डनचे उदघाटन २७ ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. गार्डनचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव कुलगुरू प्रा.डॉ.पी.पी.पाटील यांच्याहस्ते होणार आहे. कार्यक्राम उपस्थितीचे आवाहन प्राचार्य एम व्ही बिल्दीकर, उद्यान प्रमुख प्रा.डी.एन उंदीरवाडे, बॉटनी विभाग प्रमुख डॉ.पी.एस बाविस्कर यांनी केले आहे.
यांची राहणार उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चाळीसगाव एज्यूकेशनचे चेअरमन नारायण अग्रवाल तर प्रमुख अतिथी व दाते संस्था सचिव डॉ.विनोद कोतकर व प्रमुख उपस्थिती संस्था अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, डॉ.एम.बी.पाटील, संचालक जगन्नाथ अग्रवाल, मु.रा.अमृतकार, सुरेश स्वार, ॲड.प्रदीप अहीरराव, अशोक वाणी, शामलाल कुमावत, राजेंद्र चौधरी, डॉ.हेमांगी पुर्णपात्रे, कनकसिंग राजपुत, डॉ.सुनिल राजपुत, योगेश अग्रवाल, डॉ.सत्यजित पुर्णपात्रे, निलेश छोरीया यांची असणार आहे.