चाळीसगाव । प्रसिद्ध हॉकी खेळाडू भारतरत्न पुरस्कार विजेते मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसानिमित्त 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रिडा दिवस देशभर साजरा केला जातो. या क्रिडा दिवसाचे औचित्यसाधुन पोहरे येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक विजय महाले यांची कन्या निकिता महाले, के.आर.कोतकर महाविद्यालयाची विद्यार्थ्यांनी हि पंजाब येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत जुन 2014 या वर्षी राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू म्हणून तर नांदेड येथे झालेल्या अश्वमेध थाळीफेक स्पर्धेत एप्रिल 2016 या वर्षी सॉफ्टबॉल खेळाडू म्हणून तर नांदेड येथे राज्यस्तरीय हॅन्डबॉल स्पर्धेत खेळाडू म्हणून निकिता महाले कौतुकास्पद खेळली. त्यानिमित्त निकिता विजय महालेचा सत्कार रयत सेनेतर्फे सन्मानपत्र देवुन रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांच्याहस्ते करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी रयत शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष दिपक राजपूत, शिक्षक सेना जिल्हा उपाध्यक्ष दिनेश चव्हाण, कार्याध्यक्ष दिपक चव्हाण, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, कार्याध्यक्ष सुनिल निबाळकर, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष मयूर चौधरी, जयसिग भोसले, निकिताची आई पुष्पलता महाले, वडील विजय महाले आदी उपस्थित होते.