चाळीसगाव येथील डॉ.सुनिल राजपुत यांचा सन्मान

0

पद्मश्री डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते झाला गौरव
चाळीसगाव – पद्मश्री, पद्मभूषन आणि पद्मविभूशन पुरस्काराने सन्मानित झालेले डॉ. अनिल काकोडकर यांच्याहस्ते चाळीसगाव येथे ५३ व्या अखिल भारतीय मराठी विद्यान अधिवेशनात ‘महिलांचे आरोग्य’ या विषयावर परिसंवादात व्याख्यान दिले आणि डॉ.अनिल काकोडकर यांच्याहस्ते चाळीसगाव येथील डॉ.सुनिल राजपुत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या सन्मानाने माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण टिपला गेल्याची भावना डॉ.सुनिल राजपुत यांनी व्यक्त केली.

पोखरण येथील १९७४ आणि १९९८ साली भारताने जी अणुचाचणी केली त्यात त्यांचा सहभाग होता. कागदोपत्री निवृत्त वाटणारे डॉ अनिल काकोडकर अजूनही दिवसातिल बारा तास अणुकोशात राहुन भारताच्या अणुऊर्जा विषयक समस्यांचि उकल करणयात मग्न असतात. बदलत्या भारताची वेगाने वाढणारी ऊर्जेची गरज अणुशक्तिच पुरी करू शकेल असा दृढ़ विश्वास असणारा हा शास्त्रज्ञ भारताच्या अणु कार्यक्रमाचे आघाड़ीचे शिलेदार डॉ.अनिल काकोडकर यांच्याहस्ते माझा सन्मान झाला हा माझ्या आयुषातिल एक अविस्मरणीय क्षण
टिपला गेल्याची भावना डॉ. सुनिल राजपुत यांनी दैनिक जनशक्तीशी बोलताना व्यक्त केली.