चाळीसगाव येथील स्टेशन रोडवरुन मोटारसायकल लंपास

0

चाळीसगाव । शहरातील स्टेशनरोडवरील टो गॅरेज जवळुन अज्ञात चोरट्याने पॅशन एक्सप्रो मोटार 30 ऑगस्ट 2017 रोजी दुपारी 3 वाजता लांबवली असुन आज दिनांक 3 सप्टेंबर 2017 रोजी फिर्याद दिल्यावरुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अद्न्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी अनिल पितांबर महाले (40) रा शेरुळ ता मालेगाव जिल्हा नाशिक हे दिनांक 30 ऑगस्ट 2017 रोजी फवारणीचा पंप दुरुस्त करण्यासाठी त्यांची पॅशन एक्सप्रो लाल रंगाची (एमएच 41 एपी 6076) वरुन चाळीसगाव आले होते स्टेशन रोडवरील सत्तार टो गॅरेज जवळ मोटारसायकल लावुन फवारणी पंप दुरुस्त करीत असतांना अद्न्यात चोरट्याने दुपारी 3 वाजता त्यांची वरील 20 हजार रुपयांची मोटारसायकल चोरुन नेली त्यांनी सर्वत्र शोध घेतला असता मिळुन न आल्याने त्यांनी आज दिनांक 3 सप्टेंबर 2017 रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरुन अद्न्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदीप तहसिलदार करीत आहेत.