चाळीसगाव येथुन बुलेट मोटारसायकल लंपास

0

चाळीसगाव – येथील माजी जि प सदस्य यांची एक लाख १० हजाराची बुलेट मोटारसायकल अज्ञात चोरट्याने दिनांक २ ते ३ जानेवारी च्या रात्री विवेकानंद नगर आर के लॉंस समोरील घराच्या कंपाउंड मधुन चोरुन नेली आहे. याबाबत माहिती अशी की, माजी जि.प.सदस्य व जिल्हा दुध संघाचे संचालक प्रमोद पांडुरंग पाटील (वय-५०) रा.विवेकानंद नगर, आर.के. लॉस अजिंक्यतारा बिल्डींग यांची १ लाख १० रुपये किमतीची रॉयल ईनफील्ड कंपनीची क्लासीक ३५० सीसी काळ्या रंगाची (एमएच १९ सीएस ७९९९) ही बुलेट मोटारसायकल त्यांनी २ जानेवारी रोजी रात्री १० वाजता कंपाऊंडमध्ये लावली होती. ३ जानेवारी रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास त्यांचा भाऊ ब्रिजेश हे उठले असता त्यांना मोटारसायकल दिसली नाही अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास मोटारसायकल चोरुन नेली आहे याप्रकरणी प्रमोद पाटील यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास चाळीसगाव शहर पोलीस करीत आहेत.