चाळीसगाव । आईफाउंडेशन मारवाडी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ’प्रत्येक महिलेस आरोग्यदूत बनवू या’ हा उपक्रम राबवण्यात आला. यात 200 महिलांची आरोग्य तपासणी झाली. यात रक्तपेशींची तपासणी झाली. आई फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.विनोद कोतकर यांनी कुटुंबातील महिला निरोगी असेल तर संपूर्ण कुटुंबांचे स्वास्थ कायम राहते, असे सांगितले. दर महिन्याच्या 15 तारखेला आपण महिलांची अशा शिबिरातून नियमित आरोग्य तपासणी करणार आहे. अनेक आजार रक्ततपासणीतून समजत असल्याचे ते म्हणाले.
डॉ.चेतना कोतकर म्हणाल्या की, महिलांना रक्ताक्षय म्हणजे अमोनिया अधिक त्रास असतो. तपासणीत विविध आजाराच्या महिला आढळून येत आहेत. मात्र, अनेकवेळा आपणास या आजाराबाबत पुसटशी कल्पनाही नसते. त्यामुळे नियमित रक्त तपासणी करावी, असे आवाहन त्यांनी केले. मारवाडी महिला मंडळाच्या अध्यक्षा हेमा शर्मा यांनी अशा स्वरुपाचे उपक्रम मंडळातर्फे कायम राबवण्यात येतील, अशी ग्वाही दिली. या शिबिरात प्रामुख्याने हिमोग्लोबीन, पांढर्या पेशी, तंतुनलिका यांचे निदान होऊन आवश्यक त्या महिलांवर त्वरीत औषधोपचार करण्यात आले.