चाळीसगाव येथे उमंग परिवारातर्फे स्त्री-आरोग्य संवाद अभियानाला सुरुवात

0

चाळीसगाव-उमंग सृष्टी स्कुलमध्ये आमदार उन्मेश पाटील प्रेरित उमंग समाजशिल्पी महिला परिवारातर्फे स्त्री आरोग्य संवाद अभियानाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे प्रस्ताविकात परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा संपदाताई पाटील यांनी महिलांच्या आरोग्याबद्दल माहिती उपस्थितांशी आरोग्यावरील प्रश्न विचारून संवाद साधला.

आमदार उन्मेश पाटील यांनी महिलाच्या आरोग्याविषयीच्या विविध योजनांची माहिती सांगितली. यात मातृवंदना योजना, भाग्यश्री सुकन्या योजना माझ्या येथे जन्मलेल्या किती महिलांना माहिती आहे. नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले असे पंतप्रधान आहेत ज्यांनी प्रधानमंत्री मातृवंदना ही योजना सर्वच वर्गातील महिलांसाठी लागू केली. या कार्यक्रमात चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व अगंणवाडी सेविका व आशा उपस्थित होत्या. दादांनी महिलांशी संवादात तुम्हाला आरोग्याच्या किती योजना तुम्हाला माहिती आहे.

सोनोग्राफी फ्री आहे हे सांगितले. तसेच संपदाताईंनी मासिक पाळी हे एक वरदान, स्वतः शुद्ध की अशुद्ध असे प्रश्न विचारून संवाद साधला. कारण स्त्रीचे चांगले आरोग्य हीच कुटुंबाची संपत्ती आहे. तसेच मासिक पाळीत घ्यावयाची काळजी या विषयी माहिती दिली.

तसेच या कार्यक्रमाला नगराध्यक्ष आशालताताई चव्हाण, पंचायत समिती सभापती स्मितलताई बोरसे यांनी महिलांशी बोलतांना सांगितले की, प्रत्येक महिला देवाला नमस्कार करते माझे आरोग्य संपन्न राहू दे अशी प्रार्थना करते. पण महिला आपल्या आरोग्यासाठी किती वेळ देते. तसेच भडगाव येथील प.स.सदस्या अर्चना पाटील यांनी महिलांशी बोलतांना सांगितले की महिला दुर्गेचे रूप आहे.

आरोग्य ही खरी संपत्ती आहे. या कार्यक्रमाला नगरसेविका विजयाताई पवार या उपस्थित होत्या. तसेच मुख्यसेविका मंजुषा उगले मॅडम सर्वच मुख्यसेविका हजर होत्या. सूत्रसंचालन दामिनी वाघ यांनी केले. तसेच सचिव निता चव्हाण उपस्थित होत्या. तसेच फैय्याज शेख, अर्जुन पाटील, सुहास पाटील, भगवान बच्छे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.