चाळीसगाव – सरकारच्या जनविरोधी कार्यपद्धतीचा निषेध नोंदविण्यासाठी व अन्यायकारक रितीने केलेली भाववाढ तातडीने कमी करण्यात यावी यासाठी भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस व समविचारी पक्ष व सामाजीक संघटनांतर्फे १० सप्टेंबर रोजी चाळीसगावबंद चे आवाहन करण्यात आले आहे. तमाम जनतेने या बंदमध्ये सामील होऊन स्वयंस्फुर्तीने आपापली दुकाने बंद ठेवावी व या सर्वसामान्यांच्या हितास्तव असलेल्या भारत बंदला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिनीवर थेट परिणाम करणाऱ्या, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होऊन इंधन दरवाढीने ऐतिहासिक असा उच्चांक गाठला आहे. या भाववाढीमुळे शेतकरी, शेतमजुर, व्यापारी व सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले असुन जनतेला इंधन दरवाढ करुन त्यांचे जगणे महाकठीण झाले आहे. यानिमित्ताने चाळीसगाव बंद चे आवाहन करण्यात आले असुन तमाम जनतेने या बंदमध्ये सामील होऊन स्वयंस्फुर्तीने आपापली दुकाने बंद ठेवावी व या सर्वसामान्यांच्या हितास्तव असलेल्या भारत बंदला सहकार्य करावे तसेच या चाळीसगाव बंदमधे सर्व समविचारी पक्ष, व्यापारी संघटना, रिक्षा युनियन, मालवाहतूक संघटना, प्रवासी संघटना, पेट्रोल पंप संघटना यांनी सहभागी रहावे, असे आवाहन काँग्रेसचे अनिल निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिनेश पाटील आदींनी केले आहे.