चाळीसगाव येथे केकी मुस कला दालन येथे कॅमेरा पुजन

0

चाळीसगाव । जागतीक छायाचित्र दिना निमीत्त चाळीसगाव शहरातील छायाचित्रकार बांधवांनी एकत्र येत येथील जुना मालेगाव रोडस्थित जगविख्यात छायाचित्रकार के की मुस कलादालन येथे आज दि 19 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 9.30 वाजता के की मुस पुतळा व कॅमेरा पुजन केले. यावेळी केकी मुस यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पुजन करुन त्यासोबत छायाचित्रकार बांधवांच्या कॅमेर्‍याचे पूजन करण्यात आले. फोटोग्राफीत रोज नवनविन तंत्रज्ञान व आव्हाने निर्माण होत असुन भविष्यातील स्पर्धा लक्षात घेवुन छायाचित्रकार बांधवांनी एकत्र यावे. कॅमेरा पुजनानंतर सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. छायाचित्रण व्यवसायातील स्पर्धेत टिकुण राहण्यासाठी येणारया अडचणी व या क्षेत्रातील नविन तंत्रज्ञान यावर याप्रसंगी चर्चा झाली.छायाचित्रकारांनी व्यवसाया सोबत आपला आर्थिक विकास व प्रक़तीकडेही लक्ष दयावे असे मत ही यावेळी काही छायाचित्रकारांनी व्यक्त केले. व्यवसायात टिकुन राहण्यासाठी एकजुटीचा माणस यावेळी उपस्थितांमधुन व्यक्त करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
यावेळी जेष्ठ छायाचित्रकार सुरेश वर्मा, हेंमत साळी, हेंमत काकडे, राजेंन्द्र शिंदे, महेश बर्गे, निलेश काकडे, महेंन्द्र जाधव, प्रताप भोसले, हेंमत सांळुखे, राकेश मिलानी, कपील पाटील, कुणाल कुमावत, सुचित शिंपी, सुनिल पाटील, भालचंद्र दाभाडे, भोजराज आमले, दिनेश जाधव, विशाल मोरे, ईश्वर चव्हाण, दिनकर खैरनार, माजीद पिंजारी, सुनिल राठोड यांच्यासह शहर तसेच ग्रामिण भागातील छायाचित्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.