चाळीसगाव : चाळीसगाव प. स. चे बिडीओ मधुकर वाघ यांनी राजकीय पदाधिकार्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, ही दुर्देवी बाब असुन त्यांच्यावर दबाव आनुन त्यांना वेठीस धरणार्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी चर्मकार उठाव संघाच्या वतीने पोलीस निरीक्षक चाळीसगाव यांना निवेदनाद्वारे करण्यात आली असुन मागणीचा विचार न झाल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. छळ करणार्या जातीवादी शक्तीचा निषेध करण्यात आला असुन देण्यात आलेल्या प्र.मा.26 करण्यात 2011 ते 2017 प्रयत्न मनरेगाच्या सर्व कामाची चौकशी व्हावी त्यांच्यावर दबाव आणुन वेठीस धरणार्यावर कारवाई करावी अन्यथा आंदोलना ईशारा देण्यात आला आहे. निवेदनावर प्रदेश सरचिटणीस मोतीलाल अहिरे, युवकचे वाल्मीक महाले, शहरअध्यक्ष अशोक महाले यादी पदाधिकारी व कार्येकर्त्यांच्या सह्या आहेत.
चर्मकार उठाव संघ शाखा चाळीसगावच्या वतीने शहर पोलीस निरिक्षक रामेश्वर गाडे पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बिडीओ वाघ यांनी राजकीय पदाधिकार्यांच्या जाचाला कंटाळुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला राजकीय पदाधिकार्यांची शासकीय कामात ढवळाढवळ वाढत आहे. गेल्या काही दिवसा पासून बिडीओवर विहीर मान्यता भष्ट्राचाराचा आरोप होता त्यांना प.स सदस्यांकडून याद्या देण्यात आल्या होत्या त्या अनुसरुन प्रशासकीय मान्यता वितरीत करण्यात आल्या त्यात मागासवर्गीय घटक डावलुन त्यांच्या दबाव वापरुन काही भष्ट्र सदस्यानी प्र.मा लिहुन घेतल्या हे खेद जनक असुन भष्ट्राचारीच त्यांचा छळ करीत आहे 30 ऑक्टोंबर 2017 रोजी त्या सर्वा विरोधात त्यांनी पोलीसात फिर्याद दिली. त्यामुळे त्यांचा छळ वाढला हे असह्य झाल्या नेच त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.