चाळीसगाव । लग्न समारंभात चांगल्या भेट वस्तू दिल्या नाहीत, मानपान दिला नाही व प्लॉट खरेदी साठी माहेरून 4 लाख रुपये आणले नाही या कारणावरून विवाहितेचा छळ करणार्या औरंगाबाद येथील पतीसह संसार कडील 4 जणांविरोधात विवाहितेच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृषाली विक्रम राठोड (27, रा. गणपत नगर, उल्हास नगर, ठाणे ह मु. मानसी हौसिंग सोसायटी, अरिहंत नगर चाळीसगाव) यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, त्यांचे लग्नात पती व संसार कडील मंडळींना चांगल्या भेटवस्तू दिल्या नाहीत. लग्नामध्ये नातेवाईकांना मानपान दिला नाही व प्लॉट खरेदी साठी माहेरून 4 लाख रुपये आणले नाही म्हणून त्यांचे पती विक्रम देवदास राठोड, सासु संजीवनी देविदास राठोड, सासरा देविदास पांडुरंग राठोड, दीर सचिन देवदास राठोड (सर्व रा. देवळाली रोड बीड बायपास शिवाजी नगर) यांनी 15 मे 2014 नंतर 6 महिन्यापासून ते आज पावेतो त्यांचे सासरी औरंगाबाद माहेर चाळीसगाव व कल्याण या ठिकाणी शारीरिक मानसिक छळ करून गांजपाट केला तसेच मारहाण शिवीगाळ म्हणून वरील 4 आरोपीविरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार चौधरी करीत आहेत.