चाळीसगाव। येथील प्रभाग क्रमांक 2 मधील पंचशिल नगर ते पुला पर्यतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाला शनिवारी 20 रोजी सुरुवात करण्यात आले. नागरी दलीत वस्ती सुधार योजनेंतर्गत या रस्त्याचे कामकाज होणार आहे. रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी 17 लाख 41 हजार 990 रुपयाचा निधी मंजुर करण्यात आला आहे. आमदार उन्मेष पाटील यांच्या प्रयत्नाने या कामास मंजुरी मिळाली आहे. नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे पूजन करण्यात आले.
कामासाठी 17 लाख 41 हजार 990 रुपयाचा निधी
यावेळी विश्वास चव्हाण, नगरसेवक आनंद खरात, नगर पालीका अभियंता राजेंद्र पाटील, कॉन्ट्रॅक्टर एकनाथ चौधरी, दीपक देशमुख, धर्मजित खरात, जगदीश जाधव, निलेश पटावकर, सनी रणधीर, तुकाराम खरात, किसन रणधीर, दिनेश रोकडे सर्जेराव खेडकर, संदीप सोनवणे, भास्कर रोकडे, आकाश रणधीर, योशोदीप रणधीर, निलेश वाघ, सचिन जाधव, शाम गायकवाड, अनिकेत रणधीर, जयेश खरात यांच्यासह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.