चाळीसगाव येथे तीन जणांवर हल्ला

0

चाळीसगाव । आधार कार्ड फाडल्याच्या कारणावरून चौघांनी तिघांवर लोखंडी रॉड, आसारी व सुरीने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना 3 डिसेंबर 2017 रोजी दुपारी 3.15 वाजता शहरातील उर्दु बालवाडी शाळे मागील सुरेश पहेलवान यांच्या घराजवळील पाणी टाकीजवळ घडली असुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला चौघांविरोधात  दिनांक 4 रोजी फिर्यादीच्या जवाबावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सलीमखान ईस्माईलखान रा उर्दू बालवाडी शाळे मागे चाळीसगाव याने फिर्यादी जाबीरखान बुर्‍हान खान 38 ड्रायव्हर रा उर्दू बालवाडी शाळे मागे चाळीसगावयाचा भाऊ रफीकखान याचे आधार कार्ड फाडल्याच्या कारणावरून आरोपी भैय्या उर्फ नेहाल खान सलीम खान याने जाबीरखान बुर्‍हान खान यांच्या डोक्यावर, छातीवर लोखंडी रॉड मारुन गंभीर दुखापत केली तर आरोपी अन्वरखान बाबेखान व बबलु सलीम खान यांचा भाचा याने रफीक खान याच्या डोक्यावर, हातावर हत्यार मारुन दुखापत केली व फिर्यादीचे वडील बुर्‍हान खान यांच्या डाव्या पायावर आरोपी सलीम खान ईस्माईल खान (सर आरोपी रा उर्दू बालवाडी शाळेमागे चाळीसगाव) याने सुरी मारुन दुखापत केली आणि पोटावर बुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली म्हणुन जखमी फिर्यादी यांनी आज दिनांक 4 रोजी फिर्याद दिल्यावरुन वरील 4 आरोपींविरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपींना अटक करण्यात आली आहे तपास पो उ नि राजेश घोळवे करीत आहेत.