चाळीसगाव – बंद घराचा कडी कोयंडा तोडुन घरातील कपाटातील २ हजार रुपये रोख रकमेसह १५०० रुपयाच्या चांदीच्या साखळ्या अज्ञात चोरट्यांनी ८ सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळी ६ ते ९ रोजी सकाळी ७.१५ वाजेदरम्यान शहरातील धुळे रोडवरील हॉटेल राणी पार्क मागुन चोरुन नेले आहे. ग्रामसेवक योगेश एकनाथ निकम (वय- ३२) रा. पिंपळवाड म्हाळसा ह.मु. धुळेरोड हॉटेल राणीपार्क मागे, चाळीसगाव हे ८ रोजी पोळा सणानिमित्त त्यांच्या तालुक्यातील पिंपळवाड म्हाळसा गावी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास गेले होते दिनांक ९ रोजी सकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी येवुन पाहीले असता त्यांच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडुन घरात असलेल्या कपाटातील २ हजार रुपये रोख व १५०० रुपये किमतीच्या चांदीच्या साखळ्या अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्या असल्याची खात्री झाल्यावरुन त्यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार बापुराव भोसले करीत आहेत.