चाळीसगाव येथे पर्यावरण पूरक वटपौर्णिमा साजरी

0

चाळीसगाव। उमंग समाजशिल्पी महिला परिवारातर्फे पर्यावरण पूरक वटपौर्णिमा फुले कॉलनी, ढेपे वाडा येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उमंग समाजशिल्पी महिला परिवारातील महिला सदस्या उपस्थित होत्या. गेल्या 6 वटपौर्णिमा साजरी करण्यात येते.

संपदाताई पाटील यांनी पर्यावरण वाचविण्यासाठी महिलांनी पुढे यावे असे आवाहन केले. या कार्यक्रमात उमंग समाजशिल्पी महिला परिवारातील सदस्य तसेच कोअर टीम देखील आवर्जून उपस्थित होत्या. यावेळी सुवर्णा राजपूत, निता चव्हाण तसेच साधना पाटील, डॉ.ज्योती पाटील, आरस्ता माळतकर, ललिता पिंगळे, पद्मजा खराडे, वैशाली पाटील, संगीता मराठे, मेनका जंगम, सरला येवले, वैशाली चौधरी, कल्पना पाटील, कल्पना देशमुख, मीरा वाघ, तसेच इतर महिला सदस्या हजर होत्या.