चाळीसगाव । लोकनेते स्व. पप्पू दादा गुंजाळ सामाजिक प्रतिष्ठान चाळीसगाव व सेव्हन हिल्स हॉस्पिटल अंधेरी यांच्या संयुक्त विद्यमाने दि 21 मार्च 2017 रोजी महा आरोग्य शिबीर संपन्न झाले असून या शिबिरात शहर व ग्रामीण भागातल्या 145 रुग्णांची हृदय तपासणी तर 357 रुग्णांच्या इतर तपासण्या करण्यात आल्या आहेत. या शिबिराचे आयोजन लोकनेते स्व. पप्पू दादा गुंजाळ यांच्या खरजई रोड स्थित संपर्क कार्यालयात करण्यात आले होते.
145 रूग्णांची हृदय तपासणी
शिवसेना उपजिल्हा प्रमुख उमेश उर्फ पप्पू दादा गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सेव्हन हिल्स हॉस्पिटल अंधेरी येथील डॉ ख्वाजा मुजावर, डॉ रोहन जाधव डॉ सुहास जाधव, टेकनिशिअन जयदीप साहिल, एक्सिक्टिव्ह संतोष धाग यांच्या टीमने हृदय, अँजिओग्रापी, डायलेसिस, किडनी, आदी तपासण्या केल्या. यात ग्रामीण व शहरी भागातील 145 रुग्णांची हृदय तपासणी व 357 रुग्णाच्या इतर तपासण्या करून त्यातील काही रुग्णांवर अंधेरी येथील हॉस्पिटल मध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यावेळी रंजनाताई सोनवणे, डॉ राहुल पाटील, नकुल पाटील, यांचे सह समन्वयक राहुल मोरे, रोहित जाधव, मनीष सैंदाणे, भूषण तिरमली, शशिकांत जाधव, अनिल वानखेडे, साहेबराव काळे, प्राधिक कदम, सोमेश मुलमुळे आदी उपस्थित होते.