चाळीसगाव । महीलेचा विनयभंग केल्याची घटना घडली असून एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील भडगाव रोडवरील जयशंकर नगर मधील 29 वर्षीय महीला 30 डिसेंबर 2018 रोजी घरात असताना आरोपी योगेश विठ्ठल गवळी (रा.दत्तवाडी चाळीसगाव) हा मागावुन येवुन महीलेला मिठी मारून मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन त्यांचा विनयभंग केला. जोरात धक्का देवुन त्या बाहेर आल्यावर आरोपीने त्यांना चापटा बुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद महीलेने आज 3 जानेवारी रोजी दिल्यावरुन गुन्हा नोंदविण्यात आला.