सीसीटीव्हीत दोन चोरटे कैद
चाळीसगाव – शहरातील लक्ष्मी नगर भागातील मेडीकल मेडीकल दुकानाचा कडी कोयंडा तोडुन आतील 2570 रुपये रोख व एक कोरा चेक दोन अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना 19 रोजी रात्री 3 ते 4 वाजेदरम्यान घडली असुन मेडीकल दुकानातील सी सी.टी.व्ही.फुटेज मध्ये दोन चोरटे कैद झाले आहेत. याबाबत माहिती अशी, राहुल चंद्रकांत महाले (25) रा.एम जे नगर चाळीसगाव यांच्या मालकीचे शहरातील लक्ष्मी नगर भागात ओम गुरुदेव केमीस्ट नावाचे मेडीकल दुकान आहे याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला दोघा अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.