चाळीसगाव । राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फे तहसील कार्यालयावर शुक्रवारी 8 डिसेंबर रोजी हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी राज्यातील युती सरकारच्या कारभारा विरोधात राज्यातील जनतेमध्ये नाराजीचा सुर आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन सरकारच्या विरोधात आंदोलन करून प्रांताधिकारी शरद पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तहसिलदार कैलास देवरे उपस्थित होते. गेल्या 3 वर्षापासून सत्तेवर असलेले भाजप-शिवसेना सरकार सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे. अनेक पोकळ आश्वासने देऊन त्यांनी राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे.
नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था कोलमडून पडली
राज्यातील शेतकरी कष्टकरी कामगार लहान मोठे व्यावसायिक शिक्षक डॉक्टर अशा सर्वच स्तरात या सरकारबद्दल तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. केंद्रातील सरकारच्या नोटबंदी व जाचक जीएसटी निर्णयामुळे देशातील अर्थव्यवस्था पुर्णतः कोलमडून गेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात नेमण्यात आलेले खाजगी क्षेत्रातील विशेष कार्यकारी अधिकार्यांनी राज्याचे प्रशासनच ताब्यात घेतल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याच्या गरजेनुसार आवश्यक असलेले विषय प्राधान्य क्रमाने न घेता बुलेट ट्रेन व समृद्धी महामार्ग यासारख्या अवाढव्य योजनांसाठी राज्याचा महसूल वळविला जात आहे. आत्महत्या हा विषय आता शेतकरी आणि शेतमजूर यांच्यापुरता सिमित न राहतो, इतर अनेक क्षेत्रातही कोंडीच सापडलेले सामान्य नागरीक आत्महत्येसाठी प्रवृत्त होतील अशी गंभीर परिस्थिती या शासनाने निर्माण केली आहे. राज्य सरकारच्या अनागोंदी आणि जनविरोधी कारभाराचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, जिल्हा दुध संघाचे संचालक प्रमोद पाटील, बाजीराव दौंड, प्रदीप अहिरराव, नगरसेवक दिपक पाटील, रामचंद्र जाधव, अनिल जाधव, ईश्वर ठाकरे, विजयसिंग पाटील, छगन पाटील, भैयासाहेब पाटील, जगदीश चौधरी, मिलिंद जाधव, रावण पाटील, गोकुळ कोल्हे, जिजाबराव राठोड, अभिजीत शितोळे, जयाजी भोसले, प्रभाकर पारवे, विजय पवार, भाऊसाहेब पाटील, अमोल चौधरी, निरज अजबे, शुभम पवार, प्रकाश पाटील, यज्ञेश बाविस्कर, संजय राठोड ,किरण राठोड, सुभाष राठोड देवचंद राठोड, रावसाहेब सोनवणे, पृथ्वीराज चौधरी, अजय पाटील, निखिल देशमुख, आकाश पोळ, हृदय देशमुख, रोहीत पाटील, पंजाब देशमुख, शेखर पाटील, दत्तू मोरे, दशरथ भोसले, किरण भोसले, अनिल पाटील, रावसाहेब पाटील, बाळासाहेब पाटील यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.