चाळीसगाव येथे वेगवेगळ्या घटनेत तीघांचा मृत्यू

0

* मृतात उंबरखेडच्या दोघांचा समावेश;
* एकाची रेल्वे खाली आत्महत्या
* दुसर्‍याची गळफास
* तिसरा अपघातात ठार

चाळीसगाव । चाळीसगाव शहरातील 22 वर्षीय तरुणाचा रेल्वेखाली तर तालुक्यातील उंबरखेड येथील 23 वर्षीय तरुणाने गळफास घेवुन व 45 इसमाचा कंटेनर खाली सापडुन मृत्यू झाला असुन चाळीसगाव रेल्वे, ग्रामीण व मेहुणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू व गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी शहरातील करगाव रोडवरील श्रीकृष्ण हौसिंग सोसायटी मधील 22 वर्षीय तरुण मनोज उर्फ बंटी धोंडु काकडे याने 26 जुलै रोजी रात्री 8.55 वाजेपुर्वी चाळीसगाव डाऊन रेल्वे स्टेशन प्लाट फार्म क्रमांक 3 वर उभा असतांना भुसावळ कडे जाणार्‍या धावत्या पवन एक्सप्रेस समोर उडी मारुन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी चाळीसगाव रेल्वे स्टेशन मास्टर यांच्या खबर वरुन रेल्वे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार जंजाळकर करीत आहेत.

झाडाला गळफास घेवून आत्महत्या
दुसर्‍या घटनेत तालुक्यातील उंबरखेड येथील तुषार शालीग्राम चौधरी (23) या तरुणाने 27 जुलै रोजी सकाळी 8 वाजेपुर्वी उंबरखेड शिवारातील रामकृष्ण गणपत वाणी यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला दोरी बांधुन गळफास घेवुन आत्महत्या केली असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी काशीनाथ ताराचंद चौधरी रा.उंबरखेड ता चाळीसगाव यांनी खबर दिल्यावरुन मेहुणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार शालीग्राम कुंभार करीत आहेत.

कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
तिसर्‍या घटनेत उंबरखेड ता चाळीसगाव येथील समर्थ बँड (चाळीसगाव) पार्टीत ट्रंपेट वादक म्हणुन काम करणारे शालीक मंगा गुरव (45) हे कामानिमित्त चाळीसगाव येथे क्टीव्हा मोटारसायकल क्रमांक एमएच 19 एएच 8132 वर मालेगाव रोडवरुन येत असतांना चाळीसगावकडे येणार्‍या कंटेनर क्र (एमएच 46 एएफ 5800) ने त्यांना मागावुन धडक मारल्याने बेलगंगा साखर कारखान्याच्या पुढे रसवंती जवळ 27 रोजी दुपारी 1 ते 1.30 वाजेच्या सुमारास ते कंटेनरच्या मागच्या चाकाखाली आल्याने दाबल्या जावुन त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात होताच कंटेनर चालकाने तेथुन पलायन केले. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला श्रीराम सुरेश गुरव यांच्या फिर्यादीवरुन कंटेनर वरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास पोउनि रमेश मानकर करीत आहेत.