चाळीसगाव येथे सट्टा खेळतांना एकास अटक

0

चाळीसगाव। गणेश रोड वरील गणपती मंदिरामागे कल्याण मटका या सट्टा दुकानावर एकास सट्टा लावतांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी 20 रोजी दुपारी 12.40 वाजता सुरेश पवार यांना अटक करण्यात आली. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हांची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक आदीनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र रसेडे, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे, डी.बी.पथकाने मटका अड्डयावर छापा मारला. या छाप्यात मटका जुगाराचे साहित्य व 660 रुपये रोख जप्त करण्यात आले.