चाळीसगाव येथे सट्टा व अवैध दारु विक्रेत्यावर पोलीसांची कारवाई

0

चाळीसगाव – चाळीसगाव शहरातील बसस्टँड व गणेश रोड परीसरात सट्टा व अवैध देशी दारु विक्री करणार्‍या अशा तिघांवर जळगाव एलसीबी व चाळीसगाव शहर पोलीसांनी ताब्यात घेवुन कारवाई केली असुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 7 जानेवारी 2019 रोजी दुपारी 3.45 वाजेच्या सुमारास चाळीसगाव बसस्थानक मागे टपरीच्या आडोशाल सट्टा घेणार्‍या विकास साहेबराव पाटील (वय-34) रा नारायणवाडी चाळीसगाव यास सट्याची साधने व अडीच हजार रोखसह ताब्यात घेतले आहे. दुसरी कारवाई बस स्टँडच्या मागे टपरीच्या आडोशाला विनापरवाना टँगो पंच देशी दारुच्या 780 रुपये किमतीच्या 15 बाटल्या जवळ बाळगुन अवैध विक्री करणार्‍या राजेंद्र ज्ञानेश्वर गाडे (वय-33) रा नारायणवाडी चाळीसगाव यास ताब्यात घेतले आहे वरील दोघा आरोपींवर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करुन तपास हवालदार बापुराव भोसले करित आहेत. तर तिसरी कारवाई जळगाव एलसीबीने शहरातील गणेश रोडवर भारती टी शेजारी दुपारी 4 वाजता सट्टा घेणार्‍या मुकेश दिगंबर पाटील (वय-30) रा.गणेश रोड चाळीसगाव यास 3250 रुपये रोख व सट्ट्याच्या साधनासह ताब्यात घेवुन पोकॉ रामकृष्ण पाटील यांच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .तपास पोलीस नाईक गोपाल भोई करीत आहेत.