चाळीसगाव । चर्मकार उठाव संघ आणि रविदास जयंती उत्सव समिती चाळीसगावच्या वतीने रविदास जयंतीचे औचित्त साधून शहरात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. सालाबादा प्रमाणे येथील भडगाव रोड रविदास सोसायटित कीर्तन सप्ताह साजरा होत असून नामवंत महाराज ज्ञानार्जन करतील कीर्तनातून ज्ञानार्जन करण्याचे हे सलग 35 वे वर्ष असून भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकानी केले आहे.
सात दिवसाचे कार्यक्रम याप्रमाणे
शुक्रवार 10 फेब्रुवारीपासून कार्यक्रमास सुरुवात झाली पहिल्या दिवशी सर्वश्री हभप जितेश महाराज (बोरनार)यांचे कीर्तन झाले तर आज 11 रोजी जगन्नाथ महाराज (बागलेश्वर), 12 रोजी सुखदेव म्रहाराज पिंपळवाड), 13 रोजी सोमनाथ महाराज ( हातगाव), 14 रोजी भाईदास महाराज(देवगाव), 15 रोजी मच्छिंद्र महाराज (वाडीभोकर), 16 रोजी पाडुरंग महाराज (आवारकर) कीर्तनातून ज्ञानार्जन करणार आहेत. यासाठी अधिक परिश्रम जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मोतीलाल अहिरे, प्रदीप वाघ, भगवान मोरे, सोमा मोरे, गोकूळ वराडे, मुरलीधर बोरसे, निवृत्ती बोरसे, सुभाष महाले, संजय मोरे, सोपानदेव मोरे, उत्तम सोनवणे, देवराम वाघ, उत्तम सोनवणे, दिगंबर मोरे, अशोक मोरे, जयराम बोरसे, योगेश अहिरे, अनिल वाघमारे घेत आहेत.
17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 ते 11 या वेळेत सत्यपालची सत्यवाणी फेम सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज ( आकोला) यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम चाळीसगाव शहरातील बलराम व्यायांम शाळेच्या भव्य प्रांगणात होईल.कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन चर्मकार उठाव संघाचे राज्य सरचिटणीस मोतीलाल अहिरे, प्रदेश सरचिटणीस वाल्मिक महाले,जिल्हा अध्यक्ष लहू बाविस्कर, तालुका अध्यक्ष बापु अहिरे.शहर प्रमुख अशोक महाले यांनी केले आहे.