चाळीसगाव । महानगरपालिका, नगरपालिका, संवर्ग कर्मचारी, कामगार कर्मचारी कृती समिती, महाराष्ट्र राज्य यांचे आदेशान्वये बुधवारी 9 ऑगस्ट रोजी कॉ. देविदास बोदर्डे, सदाशिव सोनार, बागरे गुजराथी, सफाई कामगार संघटना, एन.ओ.सुर्यवंशी यांचे नेतृत्वाखाली चाळीसगाव नगरपरिषदेच्या सर्व कर्मचारी व कामगारांनी त्यांच्या प्रलंबित मागण्या सामुदायिक रजा व धरणे आंदोलनात सहभाग घेऊन आंदोलन करण्यात आले. आंदोलनात रोजंदारी कामगार, पाणी पुरवठा, बांधकाम कर्मचारी व घरपट्टी विभागातील कर्मचारी, आरोग्य विभाग, अग्नीशमनकक्षेतील कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील सफाई स्त्री, पुरुष कामगारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
कर्मचार्यांच्या या आहेत मागण्या: सन 1993नंतरचे व सन 2000 पर्यंतच्या रोजंदारी कामगारांना कायम करा, कामगार न्यायालयातून कायम झालेल्या कर्मचारी कायम करा. (आठ दिवसात कायम करण्याचे आश्वासन दिले होते.) चाळीसगाव नगरपरिषदेतील कर्मचार्यांना सहावा वेतनानुसार पगार मिळतो. मात्र नगरपरिषदेने सहावा वेतनाचा फरक दिला नाही, दिवाळी, दसरा सणासाठी फरकाची रक्कम द्या, चाळीसगाव नगरपरिषदेतील रिक्त पदे भरा, नगरपरिषद कर्मचार्यांना सातवा वेतन लागु करा, इत्यादी 16 मागण्यांचा समावेश असून शासनाने त्वरित मंजूर कराव्यात अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.