चाळीसगाव। सोलापुर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यास सोलापुर विद्यापीठाच्या कार्यकारिणीने विरोध केल्याने चाळीसगाव येथे समस्त धनगर समाज, मल्हार सेना व रयत सेनेने याचा निषेध केला असुन तशा आशयाचे निवेदन मंगळवार 22 ऑगस्ट 2017 रोजी तहसिलदार यांना देण्यात आले आहे.
सोलापूर विद्यापिठास अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यास विद्यापीठ कार्यकारिणीने विरोध करुन जातियता निर्माण होईल, अशी भाषा वापरुन धनगर समाजाच्या भावना दुखावल्या म्हणुन चाळीसगाव तालुक्यातील समस्त धनगर समाज व मल्हार सेनातर्फे कार्यकारिणीचा निषेध केला असून सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर असे नामंतर लवकर करावे अन्यथा तिव्र आंदोलनाचा ईशारा देण्यात आला आहे.
निवेदन देतांना यांची होती उपस्थिती
निवेदनावर मल्हार सेनेचे उमवि उपाध्यक्ष गणेश जाने, रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, मल्हार सेना व धनगर समाजाचे रमेश जानराव, स्वप्नील वैदकर, सागर आगोणे, पांडुरंग बोराडे, हेमंत देवरे, सागर जाधव, धर्मराज बछे, द्न्यानेश्वर साबळे, सचिन टकले, सोमनाथ आगोणे, योगेश रावते, शंकर लेणेकर, समाधान बोराडे, खंडु कोर, वासुदेव रावते, विनय शिरसाठ, सागर रावते, कैलास आगोणे यांच्या यांच्या स्वाक्षर्या आहेत.