चाळीसगाव – शहरातील स्टेशन रोडवरील भारत गॅस एजन्सी समोर दिनांक ६ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास एका अनोळखी वृद्धाचा मृतदेह मिळुन आला आहे. याबाबत माहिती अशी चाळीसगाव येथे रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या भारत गॅस एजन्सी समोर रोडवर एका ७० ते ७५ वर्षीय अज्ञात वृद्धाचा मृतदेह मिळुन आला आहे सदर वृद्ध भिकारी असुन काहीतरी जुनाट आजाराने त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरी वरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तपास हवालदार राजेंद्र चौधरी करीत आहेत.