चाळीसगाव । शासनाच्या स्वच्छता अभियानांतर्गत मंगळवारी 26 रोजी रोटरी मिलेनियम व रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव आणि रेल्वे स्टेशन प्रशासनासह रेल्वे मजदूर युनियन यांच्या सर्वांच्या अधिकारी-पदाधिकारी यांच्यातर्फे साफसफाई मोहिम राबविण्यात आली.
याप्रसंगी जेष्ठ रोटेरियन राजेंद्र कटारिया, रोटरी क्लबचे अध्यक्ष संग्रामसिंग शिंदे, सेक्रेटरी डॉ.संदिप देशमुख, रोटरी मिलेनियम चाळीसगावचे अध्यक्ष डॉ.शैलेंद्रसिंग पवार, सेक्रेटरी मा.प्रमोद गुळेचा, उपाध्यक्ष डॉ.प्रमोद सोनवणे यांच्यासह माजी अध्यक्ष प्रितेश कटारिया, दिपक देशमुख, महेश महाजन, निलेश निकम, ब्रिजेश पाटील, सोपान चौधरी आदी उपस्थिती होती.