चाळीसगाव रेल्वे स्थानकावर जलद गाड्यांना थांबा देण्याची मागणी

0

चाळीसगाव : गेल्या तीन वर्षांपासून चाळीसगाव रेल्वे स्थानकावर जलद गाड्यांना थांबा मिळावा यासाठी रयत सेनेच्या वतीने डीआरएम व जीएम यांच्याकडे मागणी करण्यात येत आहे. परंतु, रयत सेनेच्या या मागणीकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. रयत सेनेच्या वतीने डीआरएम तसेच जीएम भुसावळ यांना महानगरी एक्सप्रेस तसेच सचखंड एक्सप्रेस या रेल्वे गाडयांना चाळीसगांव रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा तसेच भुसावळ पंढरपूर नवीन रेल्वे गाडी सुरू करावी त्याच प्रमाणे गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस या रेल्वे गाडीला गोंदिया सोलापूर दोन आरक्षित बोग्या सुरू कराव्यात अशी मागणी रेल्वे प्रशासनाला संघटनेकंडुन वारंवार करण्यात आली आहे. मात्र पाठपुरावा करुन देखील रेल्वे प्रशासन या मागणी कडेलक्ष देत नाही म्हणुन 22 रोजी खासदार ए. टी. पाटील व आमदार उन्मेष पाटील यांना भोरस येथे रयत सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, 11094 अप .11093 डाऊन महानगरी एक्सप्रेस तसेच 12716 अप .12715 डाऊन सचखंड एक्सप्रेस या रेल्वे गाडयांना चाळीसगांव रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा. तसेच भुसावळ पंढरपूर नवीन रेल्वे गाडी सुरू करावी त्याच प्रमाणे गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस या रेल्वे गाडीला गोंदिया सोलापूर दोन आरक्षित बोग्या सुरू कराव्यात. या मागण्यांचे निवेदन 23/10 /2013 तसेच दि 11/12/2013 रोजी चाळीसगांव रेल्वे स्थानकावर डी आर एम यांना देण्यात आले त्याच प्रमाणे जी एम भुसावळ यांना दि 29 /1 /2014 रोजी चाळीसगांव रेल्वे स्थानकावर निवेदने दिली आहेत. रेल्वे गाडयांना थांबा मिळावा म्हणुन पुन्हा दि 29 /7 /2015 व दि 23 /7 /2016 रोजी रेल्वे प्रबंधक यांना निवेदने दिली आहेत. तरी देखील आज पावेतो कुठल्याही गाड्यांना थांबा मिळाला नाही व संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्या मान्य केल्या नाहीत असे म्हटले आहे. रयत सेनेच्या वतीने आपणांस निवेदनाद्वारे मागणी की, रेल्वे गाड्यांना थांबा मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे आपण पाठपुरावा करुन चाळीसगांव रेल्वे स्थानकावर प्रवाशांना प्रवास करण्यासाठी सोय करुन द्यावी अशी मागणी केली आहे. रेल्वे प्रशासनाने या मागण्या पूर्ण न केल्यास पुढील आंदोलन तिव्र स्वरूपाचे राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी त्यांच्या समवेत आमदार उन्मेष पाटील उपस्थित होते. निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार जिल्हाअध्यक्ष संजय कापसे. प्रदेश सघटक पप्पु पाटील .प्रदेश सचिव प्रमोद वाघ प्रदेश समन्वयक पि एन पाटील .शेतकरी सेना तालुका अध्यक्ष दिपक राजपुत . रयत सेना तालुका अध्यक्ष बंटी पाटील शहरअध्यक्ष दत्तु पवार, मुकुंद पवार, निखिल पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते