चाळीसगाव रोटरी क्लबतर्फे ‘हॅप्पी म्युझिक शो’चे आयोजन

0

चाळीसगाव । भारतीय संस्कृतीत सज्ञान असलेल्या व्यक्तीला लैंगिक गोष्टी विचारांची प्रगल्भता आल्यानंतरच ज्ञात होत होती. मात्र सध्याच्या परिस्थिती वयाच्या 15 व्या वर्षी मुलगा एचआयव्ही बाधित होत असेल तर हे कोणत्या जागृत समाजाचे लक्षण आहे, असे झणझणीत वास्तव समाजासमोर हसेगाव, ता. लातूर येथील हॅप्पी इंडियन व्हिलेज सेवालयाचे प्रणेते रवी बापटले यांनी हॅप्पी म्युजिक शोच्या व्यासपिठावरून मांडले.

लग्नाआगोदर एचआयव्ही चाचणी करायला हवी
आई वडिलांची चूक या चिमुकल्यांच्या हे सुंदर जग पाहण्याआधीच असे आजार भोगावे लागत असेल तर हे थांबायला हवे. प्रत्येक जागृत पालकाने आपल्या मुलीचा हात दुसर्‍या वर पक्षाच्या हातात देण्यापूर्वी वराची एचआयव्ही चाचणी करायला हवी. यासह सेवालयाच्या माध्यमातून होणार्‍या कार्यक्रमांची माहिती देत जागृत समाजाने जागरूकतेने मदत करून या माझ्या लेकरांना हे सुंदर जग पाहण्याचे बळ द्यावे, असे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर डॉ. सुनील राजपूत, डॉ. संतोष मालपुरे, राहुल वाकलकर, मेघा बक्षी, संकेत छाजेड, डॉ. विनोद कोतकर, प्रितेश कटारिया, मानसी कटारिया, स्नेहा शिंदे आदी उपस्थित होते.

यांनी घेतले परीश्रम
यावेळी रवींद्र शिरुडे यांनी विद्यार्थ्यांना प्रोटीन पावडरचे डबे दिले. अतिथींचा परिचय डॉ. संतोष मालपुरे यांनी केला. प्रास्ताविक राहुल वाकलकर यांनी केले. डॉ.सुनील राजपूत यांनी कार्यक्रमाचा हेतू विशद करून समाजामध्ये जागृती होणे गरजेचे असल्याचे सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी चित्रसेन पाटील, राहुल पाटील, कुलदीप चौधरी, अतिश कदम, किशन चौधरी, अक्षय कापडणे, अंकिता इसरानी, दीपक पाटील, माधुरी जाधव, तक्षक ठोंबरे, कल्पेश राणा व कोर कमिटीचे सदस्य तसेच रोटरी, रोट्रॅक्ट व इनरव्हील क्लबच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन दीपक पाटील तर आभार मानसी कटारिया यांनी मानले.