उंबरखेडच्या घटनेचा पंचनामा व चौकशी मागण्यासाठी आंदोलन ; चंदनाची झाडे तोडल्याने वन विभागाने गुन्हा दाखल करण्याची मागणी
चाळीसगाव- गेल्या शनिवारी उंबरखेडमधील काळभैरव मंदिर परिसर व गिरणा नदी काठी असलेल्या जुने गावठाण जागेवर राहणार्या सखुबाई गोपीनाथ सोनवणे महिलेच्या चंदनाची झाडे सरपंच केदारसिंग पाटील, उपसरपंच बबलू पाटील अज्ञात तीन इसमांनी जेसीबीच्या साह्याने उपटून टाकलहव त्याची मालेगावच्या व्यापार्याकडे विल्हेवाट केली. या घटनेचा पंचनामा कायदेशीर पद्धतीने लवकरात लवकर व्हावा व चंदनाच्या झाडाच्या चोरीमुळे वनविभागाने सरपंचावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी एकलव्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारपासून शहरातील पोस्ट ऑफिस समोरच्या वन विभागाच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केल्याने खळबळ उडाली आहे.
सणासुदीला न्यायासाठी ठिय्या
उंबरखेड येथील महिला सखुबाई सोनवणे यांचेवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात शासनाने ताबडतोब कार्यवाही करावी याकरिता एकलव्य संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष पवनराजे सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अड. राजन वाघ धुळे, तालुका अध्यक्ष पिंटू शांताराम गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष तानाजी वाघ ,जिल्हा सचिव संजय मोरे, तालुका उपाध्यक्ष अरुण गायकवाड ,टायगर फोर्स चे जिल्हाध्यक्ष गणेश वाघ, सचिव मोतीलाल पवार, शहराध्यक्ष सुरेश सोनवणे, शांताराम सोनवणे, विनोद सोनवणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी सामाजिक वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या पोस्ट ऑफिस समोरील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
काय आहे मागणी ?
शनिवार, 3 रोजी पीडित सखुबाई गोपीनाथ सोनवणे या भिल्ल आदिवासी समाजाच्या महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून तिच्या मालकीची तीन ते पाच सागाची झाडे तोडल्याने या अगोदरच उंबरखेड सरपंच केदारसिंग पाटील व उपसरपंच पैलवान बबलू पाटील यांच्या सह अन्य तीन जणांवर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याच्या अनुषंगाने कायदेशीर कार्यवाही लवकरात लवकर व्हावी यासाठी जागेचा पंचनामा व चौकशी अहवाल वनविभागाने तातडीने सादर करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
चंदन चोरीमुळे वनविभागाने दाखल करावा गुन्हा ; पवनराजे सोनवणे
चंदनाची झाडे तोडल्याने वनविभागाने या तक्रारीची सखोल चौकशी करावी ही झाडे तोडली व परस्पर मालेगावच्या व्यापारी यांना संबंधितांनी विकली या अनुषंगाने फॉरेस्ट कायद्या नुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी एकलव्य संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष पवनराजे सोनवणे यांनी केली आहे
चौकशी साठी अवधी लागेल -वन परीक्षेत्र अधिकारी संजय मोरे
उंबरखेड येथील घटनेच्या चौकशी साठी संबंधित वनपाल यांना सखोल चौकशी अहवाल सादर करण्यासाठी नेमले आहे मी पारोळा वनक्षेत्रात शिवरे घटनेतील बिबट्याचा विसेरा घेऊन आज नाशिक येथे आलो आहे . चौकशीसाठी चार पाच दिवस अवधी हवा आहे या घटनेची निष्पक्षपाती पणे चौकशी केली जाईल अहवाल सादर झाल्या वर पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत पावले उचलली जातील संघटनेने सबुरीने घ्यावे कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही अशी माहिती भ्रमणध्वनी वर वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मोरे यांनी ‘जनशक्ति’शी बोलताना दिली.