चाळीसगाव वन विभागातर्फे 96 गॅस कनेक्शनचे वाटप

0

चाळीसगाव । वन विभागाकडून ज्या गावांनी वन संरक्षणात चांगल्या रीतीने सहभाग घेऊन अवैध वृक्षतोड, वन जमिनींवरील अतिक्रमण, शिकार, वणवा, अवैध चराई वर प्रतिबंध केला अश्या गावातील कुटुबांना वन विभागातर्फे गॅसचे वितरण करण्यात आले. यात उपखेड 58, दरेगाव 9, देवळी 2, वरखेडे 19, तामसवाडी 8 या गावांमधील अनुसुचित जाती व जमातीच्या 96 लाभार्थ्यांना एल.पी.जी गॅस कनेक्शन चे वाटप आमदार उन्मेष दादा पाटील व झेडपी सदस्य भूषण पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते शनिवारी 29 रोजी करण्यात आले.

यावेळी उपखेड येथील ग्रामस्थांना एल.पी.जी गॅस कनेक्शन मंडप, इन्व्हर्टर, दरेगाव येथील ग्रामस्थांना मंडप व खुर्च्या या सह इतर गावातील लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. आमदारांनी वनांचे रक्षण करण्यासाठी आवाहन करून वनांचे महत्व विशद केले. वने असतील तर भविष्यात पाणी मिळेल म्हणून वने वाचावा पाणी वाचावा असा संदेश देत वृक्ष लागवड करण्यास सांगितले. वनक्षेत्रपाल संजय मोरे यांनी योजना समजावून सांगत इतर गावांनी वृक्षांच्या संवर्धनाकरिता पुढाकार घ्यावा व योजनेचा लाभ घेऊन हरित सेनेत सहभागी होऊन शासनाच्या 4 कोटी वृक्ष लागवड योजनेत भाग घेऊन 1 ते 7 जुलै या कालावधीत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी असे आवाहन केले.

मान्यवरांची होती उपस्थिती
यावेळी आमदारांच्या हस्ते हरितसेना सद्यस्त्व प्रमाणपत्र देण्यात आले. पंचायत समितती सदस्या भारती पाटील, गट विकास अधिकारी मधुकर वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी मगर, वन संरक्षण समितीचे सरपंच विकास पाटील, छोटू पाटील, पोलीस पाटील सोनावणे, पी. आर. पाटील, दिगंबर पाटील, शेषराव पाटील, उपस्थितीत होते. प्रास्ताविक उपखेड येथील भास्कर वाघ यांनी केले तर कार्यक्रम यस्वीतेसाठी घेडेगाव वनपाल आझाद शेख, उपखेड वनरक्षक प्रकाश पाटील, जुनपणी वनरक्षक, संजय चव्हाण, बाळू शितोळे, नाना सोनावणे, वनमजूर सलीम शेख व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.