चाळीसगाव विभागाचे एएसपी प्रशांत बच्छाव यांचा खान्देश मराठा भूषण पुरस्काराने होणार सन्मान

0

बदलापूर येथे 6 जानेवारी रोजी पुरस्काराचे वितरण ; स्मिता बच्छाव यांनाही खान्देश मराठा कन्या पुरस्कार जाहीर

चाळीसगाव- चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव व त्यांच्या सुविद्य पत्नी स्मिता बच्छाव यांना बदलापूर येथील खान्देश मराठा पाटील मंडळाने खान्देश भूषण व खान्देश कन्या पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराचे वितरण नवीन वर्षात 6 जानेवारी रोजी बदलापूर येथे होणार आहे. पुरस्कार वितरणासाठी खान्देश मराठा पाटील मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.बाबासाहेब मोहने यांची विशेष उपस्थिती राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यमान अध्यक्ष देवीदास बोरसे असतील. याप्रसंगी आमदार कपिल पाटील, आमदार किसनराव कथोरे, आमदार सीमा हिरे, आमदार नरेंद्र पवार, आमदार निरंजन डावखरे, अंबरनाथ आमदार बालाजी किणीकर धुळे येथील माजी आमदार शरद पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

सामाजिक कार्याची दखल
प्रशांत बच्छाव व स्मिता बच्छाव यांना हा पुरस्कार त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल देण्यात आला आहे. प्रशांत बच्छाव यांनी आपली पोलिस खात्यातील जबाबदारीची नोकरी सांभाळत असतानाच समाजामध्येही आपल्या चांगल्या कामाचा परीचीत दिला आहे. स्मिता बच्छाव या युगंधरा फाऊंडेशनच्या संस्थापिका असून त्यांच्या या फाउंडेशनच्या माध्यमातून जनजागृती तसेच शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी पोलिस कर्मचार्‍यांच्या पत्नी यांच्यासाठी भरीव कार्यक्रमातून मोलाचे योगदान दिले आहे त्याचप्रमाणे कमी वयामध्ये आत्महत्या करणार्‍या विद्यार्थी, तरूण वर्गासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन त्या रोखण्यासाठी त्यांची जनजागृती कौतुकास्पद आहे. आपली कौटुंबिक जबाबदारी तसेच नोकरी सांभाळून हे दोघेही दांपत्य सामाजिक क्षेत्रामध्ये उत्तम योगदान देत असल्याने त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.