चाळीसगाव विभागाला गुन्हेगारीतून मुक्त करणार : नूतन अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांची ग्वाही

चाळीसगाव : चाळीसगाव विभागाच्या अपर पोलीस अधीक्षकपदी रमेश चोपडे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी बुधवार, 22 रोजी अपर अधीक्षक सचिन गोरे यांच्याकडून पदभार स्वीकारला. याप्रसंगी त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, यापूर्वी गुप्तचर विभागात काम केले असल्याने पाच जिल्ह्यांशी संबंध आल्याने चाळीसगाव विभागाबाबत आपल्याला माहिती आहे. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून आपण करणार असून चाळीसगाव विभाग गुन्हेगारीमुक्त करण्यावर आपला निश्‍चितच भर असेल. या माध्यमातून गुप्तचर विभागाचे जाळे स्ट्राँग करण्यात येईल. पोलीस कर्मचार्‍यांचे घराचे व अन्य प्रश्‍न प्राधान्याने सोडवण्यात येतील व पोलीस कल्याणाकडे देखील विशेष लक्ष देण्यात येईल. पोलीस ठाण्यात तक्रार घेवून येणार्‍या नागरीकांच्या तक्रारींचे निश्‍चितच निरसन केले जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.