चाळीसगाव। शहरातील करगाव रोडवरील वृंदावन नगरात घराजवळ शेडमध्ये लावलेली 20 हजार रुपये किमतीची बजाज प्लॅटीना मोटारसायकल अद्न्यात चोरट्याने 28 ते 29 मेच्या रात्री चोरुन नेली असुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला आज दिनांक 17 जुन 2017 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी चाळीसगाव शहरातील करगाव रोडवरील वृंदावन कॉलनीतील रहिवासी श्रीराम तुकाराम कुमावत (59) यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची बजाज प्लॅटीना मोटारसायकल क्र (एमएच 19 बीए 5919) ही त्यांच्या घराजवळील शेडमध्ये 28 जुन 2017 रोजी रात्री लावली होती. 29 जुन 2017 सकाळी 10 वाजता त्यांची मोटार सायकल अज्ञात चोरट्यांनी रात्री 10 ते सकाळी 10 वाजेदरम्यान चोरुन नेल्याप्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक संदीप तहसिलदार करीत आहेत.