चाळीसगाव शहरातील चोर्‍यांप्रकरणी चोरट्यांची माहिती देणार्‍यास पोलीस देणार बक्षीस

चाळीसगाव : शहरात गेल्या काही दिवसापासून चोरट्यांनी थैमान घातले आहे. वाढत्या चोरीच्या घटनांची दखल घेत चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांनी तपासाबाबत शहर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना सुचना दिल्या. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी अलीकडे जिथे जिथे चोरीच्या घटना घडल्या त्या भागात घडलेल्या चोरी विषयी कुणाला काही माहिती असल्यास वा चोरट्यांबाबत कोणाला काही माहिती असल्यास शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक के.के.पाटील (9823515373) तसेच सहाय्यक पोलिसस निरीक्षक सागर ढिकले (9594980909) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे

माहिती देणार्‍याचे नाव पोलिस ठेवणार गुप्त
चोरीच्या घटनेतील आरोपीतांची माहिती देणार्‍यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल व संबंधीतास योग्य ते बक्षिस देण्यात येईल, असेही चाळीसगाव शहर पोलीसांच्या वतीने कळवण्यात आले आहे. सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची पाहणी करून फुटेजद्वारे चोरट्यांची माहिती घेत जात आहे. शहरात गेल्या काही दिवसापासून वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरीकांसह व्यापार्‍यांमध्ये घबराट पसरली आहे.