चाळीसगाव । शहरातील प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांच्या आरोग्याशी नगरपालिका प्रशासन खेळ खेळत असून, हेच स्वच्छ भारत अभियान माननीय पंतप्रधानांना अपेक्षित आहे का? असा आरोप नगरसेविका रंजनाताई सोनवणे यांनी पत्रकाद्वारे केला आहे. प्रभाग क्र.4 मधील वाणी मंगल कार्यालयाच्या बाहेरील, पाटीदार मंगल कार्यालयाच्या बाहेरील, सावली बिल्डिंग समोरील कचरा, गजानन वाडी समोरिल कचरा, गणपती मंदिर रस्त्याच्या वळणावर, साईबाबा मंदिर समोरील कचरा, दुर्गा देवी मंदिराच्या समोर पालिका हॉलच्या मागील कचरा, मिलगेट भिंतीच्या जवळ शंकर सायकलमार्ट जवळ असलेल्या ठिकाणाचा कचरा उचलला नाही.
ठेकेदारांचा ठेका रद्द करण्याची मागणी ः महिन्याला अंदाजे 3 ते 4 लाख रूपयांचा कचरा उचलण्याचा ठेका पुणे येथील एका ठेकेदाराला दिला आहे, मात्र तो ठेकेदार चाळीसगाव येथे फक्त पैश्याचा धनादेश घेण्यापुरताच येत असून 3 ते 4 लाख रूपयांचा महिन्याला कचरा उचलला जातो का हा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. तरी त्यांचा कचरा उचलण्याचा ठेका तात्काळ रद्द करावा, अशी मागणी प्रभाग क्रमांक 4 च्या नगरसेविका रंजनाताई सोनवणे यांनी केली आहे. सदर ठेक्यातून कोणीतरी आर्थिक कमाई करीत आहे, अशी शंका येते आहे. तरी शहरातील कचरा 25 दिवसांपासून न उचलणार्या ठेकेदाराला मे वजुनचे पैसे अदा करू नयेत, नागरिकांना जलजन्य व किटकजन्य आजारांची लागण झाल्यास नगरपालिका प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहणार आहे. याबाबतचे पोलिसांनाही निवेदन देण्यात आले आहे. सदर कचरा उचलण्यासाठी नगराध्यक्ष, पाणीपुरवठा स्वच्छता सभापती, आरोग्य पर्यवेक्षक यांच्यासह अनेकांना फोन करून, लेखीपञ देखील दिलेत.
तर तक्रार दिल्लीपर्यंत जाणार
तरी वरील बाबींवर तातडीने उपाययोजना न केल्यास अन्यथा तीव्र आंदोलन 16 जुनपासून छेडण्याचा इशारा स्व.लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडीच्या नगरसेविका सोनवणे यांनी दिला आहे. तसेच गटनेते माजी आमदार राजीवदादा देशमुख यांच्याकडे तक्रार करून येणार्या सभेत याचा जाब विचारणार आहेत. तसेच पंतप्रधानांच्या दिल्ली येथील झचजकार्यालयाला तसा घाण न उचललेला कचर्यांचा फोटोंसह तक्रार ईमेलने करणार, असल्याचे प्रतिपादन नगरसेविका सोनवणे यांनी केले आहे.