चाळीसगाव शहरात एकाचे डोके फोडले

0

चाळीसगाव। थोड्या वेळासाठी मोटारसायकल घेऊन गेल्याने ती परत मागितल्याचा कारणावरून शहरातील चौधरी वाड्यातील मारोती मंदिराजवळ एकाच्या डोक्यात फायटर व दगड मारून दोघांनी जखमी केल्याची घटना मंगळवार 20 जून 2017 रोजी रात्री 9:30 वाजता घडली असून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला वैद्यकीय दाखल दिल्यावरून दोघा आरोपी विरोधात गुरूवार 22 जून 2017 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोक्याला मारहाण करून केली शिवीगाळ
चाळीसगाव नगरपरिषद रोजंदारी सफाई कामगार रघुनाथ गोपीचंद काचोटे (35, रा. गोपाळपुरा चौधरी वाडा चाळीसगाव) यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, मंगळवार 20 जून 2017 रोजी आरोपी सुरेश चौधरी उर्फ लहान सावत्या (रा. चौधरीवाडा चाळीसगाव) याने सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास त्यांची मोटारसायकल थोड्या वेळासाठी घेऊन गेला. तो लवकर न आल्याने फिर्यादी हे मोटारसायकल शोधत असतांना रात्री 9.30 वाजेच्या सुमारास आरोपी हा सुरेश चौधरी हा मोटारसायकलसह चौधरीवाड्यातील मारोती मंदिराजवळ दिसल्याने त्यास मोटारसायकल परत मागितल्याचा कारणावरून त्याने त्याच्या हातातील फायटर त्यांच्या उजव्या डोळ्याच्या खाली व डोक्यावर मारून दुखापत केली तसेच शिवीगाळ करून मारहाण केली. तर आरोपी दत्तू मुकुंदा पवार रा चौधरी वाडा चाळीसगाव याने त्यांच्या डोक्यावर दगड मारून दुखापत केल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला वरील दोघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मिलिंद शिंदे करीत आहेत.