चाळीसगाव शहरात निर्भया पथकाची मागणी

0

राष्ट्रवादी काँग्रेसची चाळीसगाव पोलीसांकडे मागणी

चाळीसगाव । चाळीसगाव शहरात चाललेली वाढती गुंडगिरी, टोळी युद्ध यामुळे सामान्य जनतेच्या मनात निर्माण झालेली भीती आणि महिला मुली यांच्या सुरक्षिततेवर निर्माण होणारे प्रश्न चिन्ह निर्भया पथक फक्त कागदावर कार्यवाही होताना दिसत नाही.पूर्वी च पथक बरखास्त करून नवीन पथक तयार करा व त्यात सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश करून घ्यावा. पोलिसांचा दरारा दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. शहरात अनेक अवैध धंदे सुरू असून त्यांना राजाश्रय मिळत आहे. या आणि अश्या अनेक विषयांवर आज चाळीसगाव येथील नवनिर्वाचित डी.वाय.एस.पी. नाजीर शेख यांची भेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी घेतली व अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
यावेळी राष्ट्रवादी तालुक्याच्या महिला अध्यक्ष सोनल साळुंखे, शहराध्यक्ष प्रतिभा पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रकाश पाटील, विद्यार्थी काँग्रेस तालुका अध्यक्ष यज्ञेश बाविस्कर, शहर उपाध्यक्ष शुभम पवार, सुजित पाटील आदी उपस्थित होते.