चाळीसगाव शहरात बुद्धविचार संमेलन उत्साहात

0

चाळीसगाव । इंडो – थायी बुद्धिष्ट फेस्टिवल आयोजन समितीतर्फे चाळीसागातील रा. वि. पतपेढी येथे बुद्ध विचार संमेलन पार पडले. 2019 फेब्रुवारी मध्ये थायलंड येथे बुद्ध धम्म महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याने त्याचे आमंत्रण देण्यासाठी व कार्यक्रमाचे प्रचार, प्रसार व्हावा ह्या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विश्‍वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

बुद्ध धम्माचे तत्व, अष्टांग मार्गाची दिली माहिती
बौद्ध धम्माचे आंतरराष्ट्रीय राजदूत ओरवान पॉन्जुलसकदी, लेफ्टनंट जनरल नड्डा पॉन्जुलसकदी, औरंगाबाद चे संघरत्न भन्ते यांनी बुद्ध धम्माचे तत्व व पंचशीलचे पालन, अष्टांग मार्गाची सविस्तर पणे माहिती दिली. बुद्ध विचार संमेलनात इंग्रजी भाषेत संवाद साधून इंग्रजी भाषेचे मराठीत भाषांतर करून औरंगाबाद चे भन्ते संघरत्न, अ‍ॅड. आशाताई शिरसाट व मेहुणबारे सरपंच संघमित्रा चव्हाण यांनी समस्त बौद्ध उपासक व उपासिका समस्त नागरिकांना सविस्तर माहिती दिली. आमदार उन्मेष पाटील, उमंग समाज शिल्पी महिला परिवारच्या संपदाताई पाटील, नगराध्यक्षा सौ आशालता चव्हाण, सोनाली लोखंडे, प्रा.गौतम निकम, नरेंद्र जैन यांची प्रमुख उपस्थिती होती. भारत आणि थायलंड येथील बुद्धिष्ट विचार व संस्कृतीचे आदान प्रदान व्हावे या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कर्यक्रमाचे प्रास्ताविक रिपाई(ए) जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक आनंद जी. खरात यांनी केले तर समारोप जितू वाघ यांनी केला.