चाळीसगाव । येथील हनुमानसिंग राजपूत नगर येथे शिवसेनेच्या नूतन शाखेचे नुकतेच उद्घाटन 24 डिसेंबर 2017 रोजी पाचोरा तालुक्याचे माजी आमदार तथा शिवसेना सहसंपर्क प्रमुख आर.ओ.पाटील यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला. यावेळी या शाखेच्या अध्यक्षपदी सुनील पवार, तर उपाध्यक्षपदी सोनू पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील, जिल्हा उपसमन्वयक महेंद्र पाटील, शहरप्रमुख नाना कुमावत, दिलीप घोरपडे, हरिभाऊ सोनवणे, श्रावण पांचाळ आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
यावेळी चाळीसगाव शहरासह तालुकाभरात वार्ड तेथे गाव तेथे घर तिथे शिवसेना या उपक्रमांतर्गत पुढील काळात शिवसेनेच्या शाखांचे जाळे विणून संपूर्ण तालुका भगवामय करण्याचे आवाहन यावेळी आर ओ पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुधीर बडगे, मयूर पवार, निलेश राजपूत, सजन पाटील, पिंटू गुरव, सलीम मिर्झा, शरीफ मिर्झा, कपिल पवार, संदीप जगताप, नितीन शिंपी, सुनील पाटील, अल्ताफ शेख, पवन गायकवाड, अन्वर बेग, दीपक महाले, गणेश भवर, किरण घोरपडे, गोपाळ परदेशी आदींनी अधिक परिश्रम घेतले.