चाळीसगाव शहरात हॉटेलमध्ये वेटरचा मृत्यू

0

चाळीसगाव । येथील बसस्टँड समोरील मयुर हॉटेलमध्ये काम करणार्‍या 55 वर्षीय वेटरचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार 21 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 8 वाजता उघडकीस आली. मालकाने हॉटेल खोलण्याचा प्रयत्न केला असता, आतमध्ये झोपलेल्या वेटरचा प्रतिसाद न मिळाल्याने शटर उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेबाबत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

चाळीसगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
चाळीसगाव शहरात बसस्टॅड समोर हॉटेल मयुर येथे राजू वखारे (55, रा. मध्यप्रदेश हल्ली मुक्काम नाशिक) हा हॉटेलात वेटर म्हणून काम करत होता. गेल्या तीन वर्षापासून सदर वेटर हा हॉटेलमध्ये काम करून तेथेच राहत होता. मागील 8 ते 10 महीन्यापुर्वी वेटर काही पैसे घेऊन निघून गेला होता. 15 दिवसापुर्वी पुन्हा चाळीसगावी येऊन मयुर हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करू लागला. नेहमीप्रमाणे 20 रोजी रात्री हॉटेलमध्ये आतील पलंगावर झोपल्यानंतर हॉटेल खोलण्यासाठी हॉटेल मालक निलेश विश्वास भोसले (38, रा. हनुमानवाडी चाळीसगाव) यांचा लहान भाऊ मयुर भोसले हा 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता शटर उघडण्यासाठी गेला असता, आत झोपलेला वेटरने कुठलाही प्रतिसाद नसल्याने सदर शटर खोलून पाहीले असता, हॉटेल मधील पलंगावर राजू वखारे हा मयत स्थितीत मिळून आला. या प्रकरणी हॉटेल मालक निलेश विश्वास भोसले (38, रा. हनुमानवाडी चाळीसगाव) यांच्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार प्रदीप परदेशी करीत आहेत.