चाळीसगाव शहर पोलिसांची कारवाई ; सात लाखांची रोकड लांबवली : चौकडी जाळ्यात

Cash of seven lakhs was extended in Chalisgaon throughout the day: four in the net चाळीसगाव : शहरात भर दिवसात महिलेच्या घरातून सात लाखांची रोकड लांबवण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी गोपनीय माहितीवरून चौकडीला अटक केली आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीसीटीव्हीवरून लागला शोध
नेताजी पालकर चौकात एक महिला आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. गुरुवार, 22 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास महिला नातवाला घेवून बाहेर गेली असता त्यांच्या घरातून चोरट्यांनी घरातून सात लाख रूपये चोरून नेले. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलिस अधिक्षक अभयसिंग देशमुख, पोलिस निरीक्षक के.के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक आव्हाडे, ढिकेले, राहुल सोनवणे, पंढरीनाथ पवार, निलेश पाटील, विनोद खैरनार आणि अमोल भोसले यांनी तांत्रिक व सीसीटीव्हीच्या आधारे रवींद्र रघुनाथ गोसावी (ठाणगाव, ता.सिन्नर, ह.मु.नाशिक) यासह त्याची पत्नी आणि इतर दोन महिला अशा एकुण चार जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीतील पाच लाख 97 हजार रुपये जप्त करण्यात आले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, पोलिस नार्ठक राहुल सोनवणे, अमोल भोसले, विनोद खैरनार, शरद पाटील आदी करीत आहे.