चाळीसगाव। गणेशोत्सव व बकरी ईद या सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधीत रहावी, यासाठी चाळीसगाव शहर पोलीसांनी वरीष्ठ अधिकारी यांच्या आदेशाने पोलिस निरिक्षक रामेश्वर गाडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी 22 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 6.30 ते 8 वाजेदरम्यान शहरात कोंबीग ऑपरेशन राबवुन वॉरंट मधील 4 आरोपींना ताब्यात घेतले आहे.
चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे, हवालदार शशिकांत पाटील, राजेंद्र चौधरी, अविनाश पाटील, पोलीस नाईक भगवान उमाळे, पोलिस कॉन्स्टेबल राहुल पाटील, गोपाळ भोई, गोपाल बेलदार, तुकाराम चव्हाण यांनी शहरात कोंबींग ऑपरेशन राबवुन बर्याच दिवसापासून कोर्टात हजर न झालेले अजामीनपात्र वॉरंटमधील आरोपी भिकन पिराजी गवळी (रा. हिरापूर रोड, चाळीसगाव), श्रावण प्रकाश जाधव (रा. भीमनगर चाळीसगाव), शेख राजु शेख इब्राहिम (रा. हुडको कॉलनी, चाळीसगाव), दिपक भिकन चौधरी (रा.चौधरी वाडा, चाळीसगाव) यांना ताब्यात घेवुन त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.