चाळीसगाव शहर पोलीसांनी पकडले 2 दरोडेखोर

0

4 फरार; 2 स्पोर्ट बाईक ताब्यात
चाळीसगाव । दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एकत्र जमलेल्या दरोडेखोरांवर चाळीसगाव शहर पोलीसांनी 15 फेब्रुवारी 2018 रोजी शहराबाहेरील कन्नड रोडवरील हॉटेल बायपासच्या मागे रात्री 10.45 वाजता छापा मारुन 2 आरोपींना दरोड्याचे साहित्य व अडीच लाखाच्या 2 स्पोर्ट मोटारसायकलसह ताब्यात घेतले. मात्र संधीचा फायदा घेवून 4 आरोपी एक मोटारसायकलसह पळून गेले असुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहराबाहेरील हॉटेल बायपास कॉर्नर च्या मागे काही दरोडेखोर दरोड्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती चाळीसगाव शहर पोउनि युवराज रबडे यांना मिळाल्यावरुन पोलीस निरीक्षक रामेश्‍वर गाडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि युवराज रबडे, डीबीचे हवालदार शशिकांत पाटील, पो.कॉ. बापु पाटील, राहुल पाटील, गोपाल भोई, संदीप पोपट पाटील यांनी वरील ठिकाणी रात्री 10-45 वाजता छापा मारुन आरोपी संजय अजित राठोड (कंजर) वय 20 रा.कुसेगाव ता.दौंड जि.पुणे, अभिमन्यू दिनेश मन्नावद (20) रा.चिखली ता.हवेली जि पुणे यांना वरील 2 मोटारसायकल व दरोड्याच्या साहित्यासह ताब्यात घेतले आहे.मात्र यावेळी आरोपी राहुल नानावत राठोड, यामिन रमेश राठोड, आदित्य गोविंद शेखावत व अर्थवेद गणेश राठोड सर्व रा पिंप्री चिंचवड पुणे हे विना नंबरच्या मोटारसायकलसह फरार झाले आहेत.