पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील, तहसिलदार कैलास देवरे यांचे केले मार्गदर्शन
चाळीसगाव – आगामी नवरात्र उत्सव, दसरा व दिपावलीच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला आज दिनांक ९ रोजी शांतता समिती सदस्य बैठकीचे आयोजन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने सायंकाळी ७ वाजता करण्यात आले होते. यावेळी पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांनी नवदुर्गा उत्सव समितीच्या मंडळांना सुचना केल्या की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डी जे, डॉल्बी ला बंदी आहे. त्यामुळे असे वाद्य लावु नये व कायद्यानचे उल्लंघन करु नये, असे झाल्यास त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल होतील अशा सुचना दिल्या. तर प्रदीपदादा देशमुख, तुकाराम कोळी, जितु वाघ, वसंत मरसाळे आदींनी आपले विचार मांडले.
बैठकीस यांचीं होती उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसिलदार कैलास देवरे होते तर व्यासपीठावर व्यापारी असोसिएशनचे प्रदीप दादा देशमुख, न पा मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, यांच्यासह पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे-पाटील, वाहतूक शाखेचे सपोनि सुरेश शिरसाठ, शहर पोलीस स्टेशनचे पोउनि राजेश घोळवे, युवराज रबडे, सुधीर पाटील यांच्यासह बैठकीस तुकाराम कोळी, वसंत चंद्रात्रे, प्रतिभा पवार, जितु वाघ, नगरसेवक भगवान पाटील, घृष्णेश्वर पाटील, रामचंद्र जाधव, आण्णा कोळी, शाम देशमुख, बापू अहीरे, रविंद्र चौधरी, फकीरा मिर्झा, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, सदाशिव गवळी, गफुर पहेलवान, दिलावर मेंबर, राजेंद्र गवळी तसेच वसंत मरसाळे, खुशाल पाटील, अल्लाउद्दीन शेख, समाधान पाटील, राजेश ठोंबरे आदी मान्यवर व शांतता समिती सदस्य, नवदुर्गा मंडळाचे अध्यक्ष, पदाधीकारी, सदस्य व ज्येष्ठ नागरीक, पत्रकार बांधव उपस्थित होते. बैठकीसाठी अधिक परीश्रम गोपनीय शाखेचे गणेश पाटील, पंढरीनाथ पवार व पोलीस कर्मचाऱ्यांनी घेतले.