चाळीसगाव शहर वाहतुक पोलीसांची वाहनचालकांवर कारवाई

0

चाळीसगाव – वाहतुकीचे नियम न पाळणे व विनाकागदपत्र वाहन चालविणे आदी कारणांवरुन चाळीसगाव शहर वाहतुक पोलीसांनी वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उचलला असून ५ ऑक्टोंबर रोजी दिवसभर ही कारवाई सुरु होती व अनेक मोटारसायकल व रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

चाळीसगाव शहरात रिक्षा, मोटारसायकलचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असुन बरेच वाहन चालक हे वाहतुकीचे नियम पाळत नाही. तसेच मोटारसायकल व ईतर वाहनांवर दादा, आप्पा, नाना, भाई, भाऊ यासह विवीध नावे टाकली जातात, फॅन्सी नंबर, विना कागदपत्रे, विना लायसन्स, हेल्मेट वापरत नाहीत, रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने लावणे अशा वाहन चालकांवर चाळीसगाव शहर वाहतुक शाखेचे स पो नि सुरेश शिरसाठ व कर्मचाऱ्यांनी कारवाईची मोहीम दिनांक ५ रोजी सुरु केली असुन सकाळ पासुन अशा मोटारसायकल ताब्यात घेवुन त्या ट्रक मध्ये टाकुन पोलीस ग्राऊंड मध्ये नेण्यात आल्या व संबंधीत मोटारसायकल चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलीसांनी ही कारवाई सुरु केल्याने अशा वाहन धारकांना कारवाईला सामोरे जावे लागले.

दरम्यान चाळीसगाव शहरात अल्पवयीन मुले ही मोठ्या प्रमाणावर मोटारसायकल चालवीत आहेत त्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात झाले आहेत ही अल्पवयीन मुले सुसाट वेगाने मोटारसायकल चालवतात त्यामुळे रस्त्यावरुन पादचारी यांना चालणे देखील कठीण झाले आहे. त्यात शाळकरी मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे सकाळी व सायंकाळी ही शाळकरी मुले शिकवणी साठी शहरातील कानाकोपऱ्यात मोटारसायकलवर जातात व वेगाने वाहने चालवित असल्याने शिकवणीची वेळ व सुटण्याच्या वेळी नागरीकांना जिव मुठीत धरुन चालवे लागते म्हणुन वाहतुक पोलीस शाखेने याकडे देखील लक्ष देवुन कारवाई करावी अशी मागणी देखील होवु लागली आहे.