चाळीसगाव शिक्षकेतर संघटनेची तालुका कार्यकारिणी जाहिर

0

संघटनेच्या सल्लागार सदस्यपदी एम.बी.पाटील यांची नियुक्ती

चाळीसगाव – चाळीसगाव तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर संघटनेच्या जनरल सभेत संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद महेश्री, उपाध्यक्ष शरद सुर्वे, सचिव आर टी मोरे यांनी तालुका कार्यकारिणीची निवड करतांना तज्ञ संचालक म्हणून याच संघटनेचे माजी जिल्हा कार्याध्यक्ष व पत्रकार एम.बी.पाटील व शिरसगाव येथील शाळेचे वरीष्ठ लिपिक मनोहर सूर्यवंशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवडीने दोघं उभयतांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तसेच एम बी पाटील हे चाळीसगाव तालुका व्रुत्तपत्रकार मित्र मंडळाचे सचिव आहेत.