चाळीसगाव शेतकी सहकारी संघात धान्य खरेदीसाठी नोंदणी सुरू

चाळीसगाव : शहरातील शेतकी सहकारी संघात शासनाद्वारे आधारभूत किमती अंतर्गत ज्वारी व मका नोंदणीस शनिवार, 16 रोजी सकाळी 10 वाजेपासून सुरुवात झाली.

खरेदीसाठी शेतकर्‍यांना आवाहन
तालुक्यातील ज्वारी, मका उत्पादक शेतकर्‍यांनी ऑनलाइन पिक पेरा असलेला सातबारा उतारा, आधार कार्डची झेरॉक्स, मोबाइल नंबर, बँक पासबुकची झेरॉक्स आदी कागदपत्र घेऊन संघाच्या मुख्य कार्यालयात येऊन ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन शेतकरी संघाचे अध्यक्ष शशिकांत साळुंखे यांनी केले आहे. दरम्यान, ज्वारीसाठी 2 हजार 738 रूपये तर मक्यासाठी 1 हजार 870 रूपये आधारभूत किंमत आहे. अधिकाधिक शेतकर्‍यांनी नाव नोंदणी करून लाभ घ्यावा, असेही साळुंखे यांनी कळवले आहे.